मनीषा साठे (ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाषा, वाणी, विचार समृद्ध करीत मोजक्या शब्दांत कथक कलाप्रकार नवोदित नृत्यांगनांपर्यंत पोहोचविण्याचे धडे मला वाचनातून मिळाले. आपण काय वाचतो, यापेक्षा कसे वाचतो, हे महत्त्वाचे आहे. पुस्तकांतील शब्दभांडारामधून कोणता अर्थ आपण घेतो, यावर वाचनाचे संस्कार अवलंबून असतात. १९७५ पासून आजपर्यंत माझ्या हातून तीन ते चार हजार कथक नृत्यांगना घडल्या आहेत. या माझ्या नृत्यप्रवासात विविधांगी पुस्तके आणि वाचनाची साथ अमूल्य असून रंगमंचावर नृत्य करण्यासोबत त्याचे शास्त्रीय महत्त्व पुस्तकातून जाणून घेणे महत्त्वाचे वाटते.

कथकचा प्रवास सुरू होण्यापूर्वी लहानपणी नाटकाची पुस्तके वाचणे मला आवडायचे. आई (विमलाबाई) नाटयदिग्दíशका असल्याने आमच्या घरी नाटकाची असंख्य पुस्तके होती. जी नाटके आई घरी बसवायची, ती माझीही तोंडपाठ होत असत. ‘वेगळं व्हायचयं मला’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मुंबईची माणसं’, ‘जावयाचं बंड’, ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या तालमी मी अनुभविल्या आहेत. नाटय़विषयक साहित्य वाचनात येत होते. त्यासोबतच बाबांमुळे (पुरुषोत्तम उर्फ बन्याबापू) मी पुस्तकांच्या जवळ जात होते. त्यांनी माझ्या वाचनाच्या आवडीला प्रोत्साहन दिले. डेक्कन जिमखाना भावे स्कूल म्हणजे सध्याची विमलाबाई गरवारे प्रशाला येथे माझे शिक्षण झाले.

शाळेत असताना वक्तृत्व किंवा इतर स्पर्धामध्ये मी सहभागी झाले नाही, पण नाटय़वाचन स्पध्रेत आवर्जून सहभागी होत असे. ‘वऱ्हाडी माणसं’ या नाटकाच्या वाचनाला मला शाळेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाल्याची आठवण आजही ताजी आहे. पुण्यातून मुंबईला गेल्यावर खार येथील बीपीएम हायस्कूल येथे महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण घेतले. त्या वेळी वाचन प्रवास सुरुच होता. कथककडे वळताना माहितीपर पुस्तकांचे वाचन आवश्यक होते. त्यामुळे १९७५ मध्ये पुण्यात कथकचे नृत्यवर्ग सुरू करताना गोदावरी केतकर यांचे ‘नाटय़शास्त्र’, िहदी अनुवादित ‘अभिनय दर्पण’, मंजिरी देव, पं. तीरथराम आझाद यांच्या पुस्तकांचे वाचन सुरू झाले. याशिवाय पं. रोहिणी भाटे, रोशन दात्ये यांची नृत्यविषयक पुस्तके वाचली. पती राजस हे आध्यात्मिक पुस्तकांचे वाचनप्रेमी होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये हे साहित्य आपोआपच येत असे. माझ्या मुलीला (शांभवी) वाचनाची आवड असल्याने आमच्याकडे विविध पुस्तकांचे संच येत असत. वाढदिवसाला खेळणी किंवा इतर वस्तूंपेक्षा मला पुस्तकेच हवी, असा हट्ट ती करीत असे. घरातील प्रत्येक सदस्याला आवडणाऱ्या पुस्तकांचे घरामध्ये वास्तव्य असल्याने मला विविधांगी पुस्तकांचा सहवास मिळत होता. िहदी भाषेतील पुस्तकांचेही वाचन सुरू होते. कथकच्यानिमित्ताने कधी आवश्यकता भासल्यास इंग्रजी पुस्तके मी संदर्भासाठी वाचते. पुस्तके हा माझ्या जीवनाचा बालपणापासूनच अविभाज्य घटक होता. त्यामुळे काही ना काही वाचन केल्याशिवाय मला रात्री झोप येत नाही. विविध विषयांच्या पुस्तकांप्रमाणेच वर्तमानपत्रांतील सदरं मी आवर्जून वाचते. सदरांचे विषय आणि लेखक हे वैविध्यपूर्ण असल्याने ज्ञानाच्या भांडारातून आपण किती मोती वेचतो, हे महत्त्वाचे ठरते.

ललित लेखन प्रकारातील पुस्तके मला आवडतात. ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो. नी. दांडेकर यांच्या पुस्तकांबरोबरच पु. ल. देशपांडे, व. पु. काळे यांच्या साहित्याचे वाचन सुरूच असते. आत्मचरित्र, प्रवासवर्णने आणि जंगल सफारी या विषयांची पुस्तके मी आवर्जून वाचते. आत्मचरित्रांमध्ये विजया मेहता, नाना पाटेकर, जयश्री गडकर, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन आणि सचिन ही मला भावलेली पुस्तके. परदेशातील जंगल सफारीपेक्षाही भारतातील जंगल सफारीविषयक पुस्तकांचे वाचन करायला मला अधिक आवडते. कथक नृत्यप्रकार शिकताना आणि शिकविताना नृत्यविषयक अनेक पुस्तकांचे मी सातत्याने वाचन केले. कथक परंपरा, सुरुवातीचा काळ, गुरूंचे योगदान अशा गोष्टी मला पुस्तकांतून समजत गेल्या. कथक नृत्याविषयी लेखकाचे विचार आणि अचूक संदर्भ यांमुळे नृत्य शिकणाऱ्या मुलींसमोर योग्य माहिती पोहोचविणे मला शक्य झाले. कथकला मौखिक ग्रंथांचा पूर्वी आधार नव्हता. परंतु अभ्यास करून अनेकांनी ते पुस्तकांतून सिद्ध केले. त्यामुळे त्यांचे नृत्याविषयीचे साहित्य ग्राह्य धरून नवोदित कलाकारांपर्यंत ते संदर्भ पोहोचविणे आवश्यक आहे. या साहित्याच्या आधारे मी नृत्यातील बारकावे माझ्या शिष्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा अभ्यास करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय आणि ललित कला केंद्राच्या ग्रंथालयात मी सातत्याने जात असे. तर, डेक्कन जिमखाना येथील पुस्तकांच्या दुकानांतून अनेक पुस्तके आणली आहेत. पुलंच्या पुस्तकांनी मला स्वत:कडे पाहायला शिकविले. तर, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची शिकवण आत्मचरित्रांतून मिळते. तुलसीदासांपासून मंगेश पाडगावकर, अरुणा ढेरे, संदीप खरे यांच्यापर्यंत अनेक कवितांची पुस्तके मी वाचते. सध्या किंडल किंवा ई-बुकसारख्या माध्यमातून मी आवडत्या साहित्य प्रकाराचे सतत वाचन करते. परदेशी प्रवास करताना अशी अत्याधुनिक साधने उपयोगी पडतात. साहित्य हे आपल्याला बसल्याजागी अनेक गोष्टी शिकविते. ते पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.