पुणे- मुंबई द्रुतगती मार्गवरील बोरघाट धुक्यात हरवल्याची चित्र बघायला मिळालं. वाहनांची हेडलाईट लावून वाहन चालकांना वाहन चालवावी लागली. एरवी वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना कसरत करावे लागते. परंतु, आज सकाळी धुक्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली. गाडीची हेडलाईट लावून वाहने चालवली.
आणखी वाचा-पुणे: एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड
पुणे- मुंबई दुर्गती मार्गावरून दररोज लाखो वाहने प्रवास करतात. अनेकदा बोरघाटात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. आज मात्र वाहतूक कोंडी ऐवजी धुक्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. घनदाट धुक्यामुळे वाहन चालकांना काही फुटावरील दिसत नसल्याने हेडलाईट लावून वाहन चालवावी लागली. त्याचबरोबर वाहनाचा स्पीड देखील यावेळी मंदावला होता. बोरघाटातील धुके बघण्यासाठी अनेक वाहन चालक वाहन रस्त्याला लावून थांबले होते. निसर्गाचा हे अल्हाददायक रूप बघण्यासाठी अनेकजण लोणावळ्यात दाखल होतात.