पुण्यात आणि पिंपरीत बॉसने केली जबरदस्ती; कंटाळून दिली पोलिसात तक्रार, आरोपी मोकाट

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित २८ वर्ष तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बी.कॉम चे शिक्षण घेतलेल्या २८ वर्षीय तरुणीला नोकरी निमित्त इंटरव्यूसाठी बोलवून बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी आणि पुण्यात तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे: समाज माध्यमांवर जरा जपूनच, तुम्हालाही होऊ शकते अटक

पश्चिम बंगाल येथील २८ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. तिच्याशी पीडित तरुणीने संपर्क केला. संबंधित मुलीने पुण्यातील हिंजवडीत पीडितेला इंटरव्यूसाठी बोलवण्यात आलं. विश्वासाने ती पुण्यात आली. इंटरव्यू ला अवधी असल्याचं सांगून संबंधित तरुणीला अर्जुन ठाकरे या व्यक्तीचा नंबर दिला. ते तुला मदत करतील ते चांगले व्यक्ती आहेत असं सांगितलं. अर्जुन ठाकरे याने पीडितेला पुण्यातील एका ऑफिसला बोलवून महेश्वर रेड्डी याच्याशी ओळख करून दिली. महेश्वर रेड्डी याने पीडीतेचा इंटरव्यू घेतला. तिथं इतर आरोपी चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख उपस्थित होते, ते कंपनीचे पार्टनर असल्याचे सांगितलं. महेश रेड्डीने पीडितेच्या समोरच अर्जुन ठाकरे ला १५ हजार रुपये दिले. तुला ही मुलगी खुश करेल असे अर्जुन ठाकरे तिच्यासमोर म्हणाला असा तक्रारीत उल्लेख आहे.

हेही वाचा >>> पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

यानंतरच खऱ्या अर्थाने पीडीतेचा विनयभंग आणि तिच्या भावनांचा खेळ सुरू झाला. तरुणीला नोकरीवर घेण्यात आलं. तीन दिवसानंतर महेश रेड्डीने इंग्रजीत अश्लील भाषा वापरत सेक्स ची मागणी केली. तरुणीला नोकरीची गरज असल्याने तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पुण्यातीलच ऑफिसमध्ये पीडितेवर रेड्डीने बळजबरी केली. पीडितेने पोलिसांना सांगेल अस म्हणताच तिला सोडून दिले. पिंपरीमध्ये देखील मिटींगचा बहाना करून पीडीतेला बोलवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करून स्वतःची सुटका केली. हा सर्व प्रकार तिने नूरजहाँ ला सांगितला. उलट नुरजहाँने मदती ऐवजी सरांना खुश कर असं सांगण्यात आल. पीडित तरुणी ऐकत नसल्याने नूरजहाँने चिरागद्दीन शेखला बोलवून घेतलं. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत तुझ्यासारख्या मुलींना दुबईत विकत असतो. तुला देखील दुबईला विकलं तर तुझ्या घरच्यांना कळणार नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तू कुठेही तक्रार केली तर तुला जीवे मारेल अशी धमकी पीडितेला देण्यात आली. पीडितेकडे असलेले ओळखपत्र, महत्वाची कागदपत्रे महेश्वर रेड्डी ने काढून घेतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तरुणीला महेश्वर रेड्डीने हॉटेलमध्ये बोलावले. तरुणी होकार देऊन मोबाईल बंद ठेवला. रात्री उशिरा मोबाईल सुरू केल्यानंतर महेश्वर रेड्डीने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील वर्तन केले. अखेर तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्राद्वारे पीडित तरुणीने स्वतः ला अर्जुन ठाकरे ने विकल्याचा आरोप केला.! २८ वर्षीय पीडित तरुणीने एक पत्र लिहिलं असून त्यात तिने न्याय मागितला आहे. अर्जुन ठाकरे हा तिच्या आजोबांच्या वयाचा असून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु, विश्वासघात करून त्याने पंधरा हजार रुपयात विकल्याचा आरोप केला आहे. अद्याप आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तरी मला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन तिने पत्राद्वारे पत्रकारांना केले आहे.

पिंपरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने म्हणाले, “पश्चिम बंगालची तरुणी आहे. नोकरी डॉट कॉमच्या संपर्कातून ती शहरात आली. नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. प्रकरण संवेदनशील असल्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे. संबंधित पोलीस ठाण्यात हा गुन्हा पाठवण्यात येणार आहे.”

“पश्चिम बंगालची तरुणी आहे. नोकरी डॉटच्या संपर्कातून ती शहरात आली. नोकरी देण्याचे आमिश दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. प्रकरण संवेदनशील असल्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे. संबंधित पोलीस ठाण्यात हा गुन्हा पाठवण्यात येणार आहे.” – राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी

Story img Loader