लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे दोन आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदार संघातील निवडणूक चुरशीची झाली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहीर झाले असून विजयी उमेदवारांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव ( वाघोली) सर्वाधिक ४०५ मते मिळवून विजयी झाले आहेत. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते मिळवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर-खराडी) ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते मिळवून विजयी झाले.

Story img Loader