बेकरीतून घेतलेला पाव खराब झाल्याने परत करण्यासाठी गेलेल्या मुलाला बेकरी चालकाने बेदम मारहाण केली. भवानी पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी बेकरीचालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे : धनकवडीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

खालीद सिद्दीक अन्सारी (वय ५३), फैजान खालीद अन्सारी (वय २९), जैद खालीद अन्सारी (वय २४, तिघे रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत संदीप जयप्रकाश पांडे (वय ३८, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांडे यांनी मुलाला बेकरीतून पाव आणण्यास सांगितले होते. पाव आंबट लागल्याने मुलाला पाव परत करण्यास पांडे यांनी पाठविले. त्या वेळी बेकरीचालक खालीद अन्सारी, फैजान अन्सारी, जैद अन्सारी यांनी मुलाला शिवीगाळ करुन बॅटने बेदम मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल संच अन्सारीने फेकून दिला. पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे तपास करत आहेत.

Story img Loader