प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपी प्रियकर, प्रेयसी आणि इतर एकाला अटक केली आहे. सुप्रिया राहुल गाडेकर, सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि रोहिदास नामदेव सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. राहुल सुदाम गाडेकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील आंबेगाव नर्हे येथे राहण्यास होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया गाडेकर ही परिचारिका (नर्स) म्हणून आंबेगाव नर्हे येथील नवले हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. मात्र, कोविडच्या काळात तिने निमगाव जिल्हा अहमदनगर येथे लॅब सुरू केली. याचदरम्यान तिची ओळख सैन्य दलात कार्यरत असलेल्या सुरेश पाटोळे याच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. दोघांच प्रेमप्रकरण सुरू होतं. यामुळे पती, पत्नीमध्ये भांडण वाढलं होतं. प्रेमात पती राहुल गाडेकर हा अडथळा ठरत होता. त्याची हत्या करण्याचे दोघांनी ठरवले तसा प्लॅन केला.

हेही वाचा – नागरिकांनी हक्कासाठी लढले पाहिजे – राहुल गांधी

डिसेंबर २०२३ मध्ये सुट्टीवर असताना सुरेश पाटोळे याने नातेवाईक रोहिदास सोनवणे यांच्यासह बाराजातून दोन लोखंडी हातोडे आणले. दोघेही योग्य वेळेची वाट पाहात होते. दहा फेब्रुवारी २०२४ रोज आंबेगाव नर्हेत राहणारा मयत राहुल गाडेकर हा पत्नीला भेटण्यासाठी निमगावला गेला. परत, चाकण येथे कामाला येत असताना पत्नीने प्रियकराला सांगून त्याच्यावर जीवघेणा हल्ला घडवला, सुदैवाने यात तो बचावला. घाबरलेला राहुल हा पुन्हा कामावर जाण्यास तयार नव्हता. पत्नी सुप्रिया मात्र वारंवार कामावर जाण्यास तगादा लावत होती. पुन्हा योग्य संधी साधून २३ फेब्रुवारी रोजी कामावर जात असलेल्या पतीची माहिती आरोपी प्रियकरला दिली. रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल गाडेकर याला गाठलं आणि मित्रासह सुरेश पाटोळे याने डोक्यात हातोडा घालून हत्या केली. तांत्रिक विश्लेषण करून गुंडा विरोधक पथकाचे पोलीस निरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या टीम आरोपीपर्यंत पोहोचले. या प्रकरणी सुप्रिया गाडेकर हिला न्यायलायने १८ तर, इतर दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

१ कोटींचा काढला होता विमा…

हत्या झालेल्या राहुल गाडेकरने १ कोटींचा विमा काढला होता. यातील रक्कम ही सुप्रियाला देखील मिळणार होती. पैकी, काही रक्कम ही प्रियकर सुरेश आणि त्याचा मित्र रोहिदासला देणार होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend murder girlfriend husband kjp 91 ssb