फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट इंडियाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री डॉ. नरंेद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कबीर कला मंच कार्यकर्त्यांचा गीतांचा कार्यक्रम व ‘जयभीम कॉम्रेड’ चित्रपट आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे दोन-दोन युवक जखमी झाले आहेत.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जय भीम कॉम्रेट हा चित्रपट आणि कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये एफटीआयआयचे चार जण, तर अभाविपचे दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूने तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.
‘कबीर कला मंच’ च्या जाहीर कार्यक्रमांना सुरुवात
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी फिल्म अंॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट इंडिया या ठिकाणी कार्यक्रम सादर केला. मंचच्या काही कार्यकर्त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे कार्यक्रम घेण्यात आला. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे व ठाणे येथून सात जणांस अटक केली होती. यामध्ये कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांना एटीएसने अटक केली होती. या प्रकरणी त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अभाविप कार्यकर्ते व एफटीआयआय विद्यार्थ्यांमध्ये कबीर कला मंचच्या कार्यक्रमावरून हाणामारी
डॉ. नरंेद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कबीर कला मंच कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार मारामारी झाली.
First published on: 22-08-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brawl between abvp activist and ftii students in kabij kala manch programme