पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येतात. त्यांना यासाठी वेगळी सुविधाही नसते. अखेर रेल्वे प्रशासनाने या अडचणीवर मार्ग काढत पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्र ‘स्तनपान कक्ष’ सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे स्थानकात फलाट क्रमांक एकवर असलेल्या महिला प्रतीक्षा कक्षात शिशू स्तनपान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रतीक्षा कक्षात स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या खोलीत खुर्ची, टेबल, पंखा, दिवे यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या खोलीस आतून आणि बाहेरून बंद करता येते. ‘चाइल्ड हेल्प फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या मातांसाठी मुलांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात स्तनपानाची सुविधा निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-पुणे: कौटुंबिक वादातून महिलेचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे स्थानकाचे संचालक मदनलाल मीणा यांच्या संयोजनात  ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.