लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चिंचवड येथे पकडले.

सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) असे लाच स्वीकारताना पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. वाल्हेकरवाडी येथील एका व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चिंचवड मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावला. मंडलाधिकारी जाधव यांना ठरलेल्या रकमेपैकी लाचेचे चार लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader