लग्न हा पूर्वी सोहळा होता आता तो एक इव्हेंट झाला आहे. सोहळ्याचा इव्हेंट झाल्यापासून विविध प्रकार अनुभवायला मिळतात. असाच एक अनोखा प्रकार पुण्यातील केडगाव या ठिकाणी बघायला मिळाला. कोमल शहाजी देशमुख या मुलीचे लग्न होते. या लग्नात तिने बुलेटवरून एंट्री घेत सगळ्यांनाच चकीत केले. नववधू बुलेटवरून आल्याचे पाहून सगळ्यांनाच नवल वाटले. कोमलच्या वडिलांनी म्हणजेच शहाजी देशमुख यांनी घरापासून लग्न मंडपापर्यंत बुलेट चालवण्याची संमती कोमलला दिली. मग काय? नववधू कोमल छानपैकी नटून थटून बुलेटजवळ आली. बुलेटवर बसून कीक मारली आणि पोहचली थेट लग्न मंडपात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरंतर लग्न म्हटलं की मुली साड्या किंवा दागिने घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र मला माझ्या लग्नात बुलेट चालवायची आहे असा आगळावेगळा हट्ट धरला. मुलींमध्ये बऱ्याचदा सोन्याचे दागिने किंवा साड्या घेण्याचा आग्रह असतो. मात्र बुलेटवरुन एंट्री घ्यायची हे कोमलचं स्वप्न होतं जे तिने लग्नात पूर्ण केलं. कोमल जेव्हा आली तेव्हा सगळेच तिच्याकडे कौतुकाने पाहात होते. सैराट सिनेमातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुने जेव्हा ऑनस्क्रीन बुलेट चालवली तेव्हा तिची चांगलीच चर्चा झाली होती. आता त्याचप्रमाणे कोमलच्या लग्नाचीही चर्चा केडगावात रंगली आहे. नववधू प्रिया मी बावरते असं फार वर्षांपूर्वीचं गाणं आहे. पण ही २०१९ मधली नववधू आहे जी न बावरता बुलेटवर बसून अनोख्या अंदाजात लग्न मंडपात पोहचली.