युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला असून, हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, त्यांना सुखरूप भारतात आणावे अशी कळकळीची विनंती युक्रेनमध्ये अडकलेल्या साक्षी बोरोटे हिच्या पालकांनी प्रशासनाला केली आहे.
साक्षी बोराटे ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षांत असून युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. तिच्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी साक्षीच नव्हे तर इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रशासनाने भारतात सुखरूप आणावे असे म्हटलं आहे. त्याचबरोबर मुलांकडे असलेले एटीएम कार्ड हे चालत नसल्याने खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांना अडचणी येत असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.
साक्षीचे वडील सतीश बोराटे म्हणाले की, युक्रेन येथे एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी मागीलवर्षी पासून माझी मुलगी साक्षी तिथे गेलेली आहे. रशिया आणि युक्रेनचा जो वाद चालला आहे. त्याचा मुलांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. माझी शासनाला एकच विनंती आहे की विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणावे. तेथील परिस्थिती भयानक आहे. मुलांना हॉस्टेलच्या बाहेर येता येत नाही. त्यांच्याकडील एटीएम कार्ड कुठेच चालत नाही. त्यामुळं ते खाद्यपदार्थ खरेदी करू शकत नाहीत.
तसेच, प्रशासनाने रस्ते मार्गाने त्यांना सुखरूप ठिकाणी घेऊन यावं ही कळकळीची विनंती. त्यांनी प्रशासनाला केली आहे. तर, साक्षीची आई सपना बोरोटे म्हणाल्या की, साक्षीशी बोलणं झालं, पण तेथील वातावरण पाहता त्यांना भीती वाटत आहे. तिच्यासह इतर विद्यार्थी आहेत. त्यांना खाद्यपदार्थची सुविधा करावी. असेही त्या म्हणाल्या आहेत.