पिंपरी चिंचवड : आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्स च्या दुकानात तीन चोरटे शिरले, त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. घटनेनंतर हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंपरी- चिंचवडच्या हिंजवडीमध्ये आज सकाळी शिवमुद्रा ज्वेलर्स नावाच्या दुकानात पिस्तूलाचा धाक दाखवून सोने- चांदीचे दागिने लुटण्यात आले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हेही वाचा…मनोज जरांगे पाटील यांचे ‘त्या’ प्रकरणातील अटक वॉरंट रद्द, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

ज्वेलर्सच्या दुकानात तिघेजण शिरल्यानंतर पैकी एकाने दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. हुज्जत घालण्यात आली, दुकानदाराला मारहाण करण्यात आली. मग, दोघांनी सोने- चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. भर दिवसा ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण आहे.

Story img Loader