निगडी परिसरातील मिलिंद नगर भागात गतीमंद भावाने व्यसनाधीन असलेल्या भावाचा डोक्यात विट घालून खून केला आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून रविवारी सकाळी समोर आली. तुकाराम गुरप्पा शिंगे अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर झटापटीत जखमी झालेल्या गतीमंद भावाचे सुरेश गुरप्पा शिंगे अस नाव आहे.दोघे एकत्र राहात होते.मतिमंद सुरेश हा भीक मागून पैसे जमवायचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सविस्तर माहिती अशी की,मयत तुकाराम गुरप्पा शिंगे वय-२५ आणि सुरेश गुरप्पा शिंगे हे दोघे निगडी परिसरातील मिलिंद नगर येथे एका खोलीत राहात होते.सुरेश हा गतीमंदअसून तो उदरनिर्वाहसाठी भीक मागायचा तर मयत तुकाराम हा व्यसनी होता तो दररोज दारू प्यायचा.

तुकाराम हा गतीमंद असलेल्या भावाला भीक मागून आणलेले पैसे मागत होता ते पैसे देण्यास सुरेश टाळत होता.त्यावरूनच यांच्यात वाद होऊन झटपट झाली यातच सुरेश ने तुकरामच्या डोक्यात वीट घातली यात तुकारामचा जागीच मृत्यू झाला आहे.तर जखमी सुरेश वर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मोठा भाऊ हा दुसरीकडे राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सुरेश ची आई देखील गतीमंद आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brother killed brother for money
Show comments