पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची नऊ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क (मोफा) कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी निर्माण प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे संचालक निलेश प्रभाकर कामठे, दीपमाला गणेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परमजितसिंग अरोरा (वय ५४, रा. कल्याणीनगर, येरवडा)यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीचा विनयभंग
बांधकाम व्यावसायिक काठे, काळे यांच्या गृहप्रकल्पात अरोरा यांनी सदनिका खरेदी केल्या होता. सदनिका खरेदी व्यवहारात अरोरा यांनी त्यांना नऊ कोटी ११ लाख रुपये दिले होते. त्यानंतर गृहप्रकल्पाचे काम पूर्ण न करता अरोरा यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. याबाबत अरोरा यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे तपास करत आहेत.