लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्वेनगर भागातील एका बंगल्यात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. बंगल्यात चोरी करून पसार झालेल्या महिलेसह साथीदाराला अलंकार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राजू दुर्योधन काळमेध (वय ४५, रा. वडगाव बुद्रुक), सोनिया श्रीराम पाटील (वय ३२, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्वेनगरमधील एका बंगल्यात चोरी झाली होती. याबाबत एका वास्तुविशारदाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय

चोरटे सिंहगड रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर केकाण, धीरज पवार, नितीन राऊत यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काळमेध याला ताब्यात घेतले. चौकशीत काळमेध आणि त्याची मेहुणी सोनिया पाटील यांनी बंगल्यात चोरी केल्याचे उघडकीस आले.
पाटील मुंबईला पसार होण्याच्या तयारीत होती. वाकड परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, अरविंद शिंदे, महेश निंबाळकर आदींनी ही कारवाई केली. काळमेध आणि पाटील यांच्याकडून एक कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे : लम्पीमुळे दगावलेल्या २९२ जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत

चोरीच्या पैशातून मालमत्ता
आरोपी काळमेध आणि पाटील यांनी चोरीच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काळमेध हाॅटेल व्यावसायिक आहे. त्याची मेहुणी सोनिया पाटील उच्चशिक्षित आहे. वडगाव बुद्रुक, वाकड, शिर्डी येथे आरोपींच्या मालकीच्या सदनिका आहेत. आरोपी महागडी मोटार वापरत असल्याचे उघडकीस आले आहे.