सराफ व्यावसायिकावर गोळीबार करुन त्याच्याकडील सोने लुटण्यात आल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर बुधवारी रात्री घडली. चोरट्यांनी सराफावर तीन गोळ्या झाडल्या असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. प्रतीक मदनलाल ओसवाल (वय ३०, रा. मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ओसवाल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोघांना पकडले

ओसवाल यांची हडपसरमधील सय्यदनगर परिसरात सराफी पेढी आहे. पेढी बंद करुन मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रतीक आणि त्यांचे वडील बी. टी. कवडे रस्त्याने निघाले होते. दुचाकीस्वार ओसवाल यांना बी. टी. कवडे रस्त्यावर चोरट्यांनी अडवले. त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. हल्लेखोरांनी ओसवाल यांना धमकावून त्यांच्याकडील २० ते ३० ग्रॅम सोने लुटले. चोरट्यांनी ओसवाल यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.