लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना कोथरूडमधील मयूर कॉलनीत घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मयूर कॉलनी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय ८ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तक्रारदार दोन दिवसांपूर्वी बाहेरगावाहून परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी सदनिकेची पाहणी केली. तेव्हा सदनिकेतून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

आणखी वाचा-शनिवारवाड्याज‌वळ ज्येष्ठ महिलेची फसवणूक, बतावणी करुन मंगळसूत्र चोरी

सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

Story img Loader