लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील अमेरिकन डॉलर चोरून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. चोरलेल्या अमेरिकन डाॅलरचे मूल्य भारतीय चलनात एक लाख ५१ हजार ९८५ रुपये आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेतील सिद्धी हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत. १८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ महिला आणि त्यांचे पती बाराच्या सुमारास नातीला शाळेतून आणण्यासाठी सदनिका बंद करून बाहेर पडले. दुपारी एकच्या सुमारास ते नातीला घेऊन घरी परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटात ठेवलेले १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले. भरदिवसा घरफोडी झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिनाभरापासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन चोरटे ऐवज चोरून नेतात.
आणखी वाचा-छळामुळे महिलेची आत्महत्या, पतीविरुद्ध गुन्हा
मुकुंदनगर भागात अडीच लाखांचा ऐवज चोरीला
स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ५० हजार रुपयाांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत जिनेश मोहनलाल ओसवाल (वय २८, रा. केदार रेसीडन्सी, मुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओसवाला कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.