पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी बाणेर रस्त्यावरील बहुमजली इमारतीमधील बंद सदनिका फोडून तब्बल १८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकाकडे ५० हजारांची लाच मागितली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बाणेर रोडवरील एल्जीयन सोसायटीत राहतात. ते कुटुंबासह शनिवारी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी घराचा दरावाजा तोडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटातील तब्बल १७ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार मंगळवारी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानतंर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

रास्ता पेठेतील मेडिकलचे दुकान फोडले –

रास्ता पेठेतील बंद मेडिकलचे दुकान फोडून चोरट्यांनी तीन मोबाईल आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणीअजित भोसले (वय ४४) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदारांचे मेडिकलचे दुकान आहे. मध्यरात्री चोरट्यांनी बंद मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary session continues in pune 18 lakhs stolen by breaking into a locked flat in baner pune print news msr