लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात एका सोसायटीत वाहने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वडगाव खुर्द भागातील मियामी सोसायटीत मध्यरात्री शिरलेल्या अज्ञातांनी दुचाकी आणि मोटारीवर ज्वलनशील पदार्थ ओतला. दुचाकी आणि मोटारी पेटवून आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस, तसेच अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.