लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सोसायटीच्या आवारात शिरुन मोटार, तसेच दोन दुचाकीं पेटवून देणाऱ्या तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी निखिल चव्हाण (वय २५), महेंद्र आहुजी (वय २५, दोघे रा. मार्केट यार्ड), आदित्य साखरे (वय २१, रा. कोंढवा खुर्द) यांना अटक करण्यात आली. याबाबत वीरेंद्र चंद्रकांत अमराळे (वय ३८, रा. गगनविहार सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
torres investment scam loksatta news
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात तिघांना अटक, २६ लाखांची रोकड जप्त

आरोपी चव्हाण, आहुजी, साखरे आणि दोन अल्पवयीन साथीदार गगन विहार सोसयाटीत शिरले. सोसायटीच्या आवारातील दोन दुचाकी, एका मोटारीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. वाहनांनी पेट घेतल्याने सोसायटीच्या आवारात मोठा धूर झाला. सोसायटीच्या आवारात घबराट उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.

आणखी वाचा-संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा १७ ऑक्टोबरला राहणार बंद, काय आहे कारण!

धनकवडी भागात दसऱ्याच्या दिवशी टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली होती. टोळक्याने या भागातील वाहनांची तोडफोड केली होती. किरकोळ वादातून एका अल्पवयीनाने साथीदारांसह जनता वसाहत परिसरात दहशत माजवित वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीत मोटारी, रिक्षा, दुचाकींसह सहा ते सात वाहनांचे नूकसान झाले. शहर, तसेच उपनगरात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोयते, तसेच दांडकी उगारून वाहनांची तोडफोड केली जाते. वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे या भागातील रहिवासी दहशतीखाली आहेत.

Story img Loader