पुणे : भरधाव बसच्या धडकेने दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात घडली. अपघातात दोन पादचारी जखमी झाले. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश चोकला आणि गिरीधारीलाल जाट अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात पादचारी अर्जुन जुजाराम देवासी (वय २३, रा. नेहरुनगर, पिंपरी), प्रवीण प्रजापती (वय २३) जखमी झाले आहेत. देवासी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसचालक किरण रवींद्र महादे (वय २९, रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल कात्रज भागातील खोपडेनगर परिसरातून निघाले होते. डोंगर उतारावर बसचालकाचे नियंत्रण सुटले.

हेही वाचा : Pune Accident : धक्कादायक! सिग्नल तोडला अन् अपघात घडला, छोटीशी चूक पडली महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल गंभीर जखमी झाले. तेथून निघालेले पादचारी अर्जुन आणि प्रवीण यांना बसचा धक्का लागल्याने ते जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि गिरीधारीलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus and bike accident many dead injured pune print news rbk 25 pbs