सिमला ऑफीस चौकात निगडी-कात्रज बसला मोटारीची धडक बसल्याने बसच्या सिलेंडरची तोटी तुटल्याने बसने पेट घेतला. चालकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. मात्र, गॅस गळती रोखण्यास तब्बल दीड तास कसरत करावी लागली. या आगीमुळे शहराच्या मध्य वस्तीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज-निगडी बस मनपाकडून सिमला ऑफीस चौकाकडे जात होती. त्या वेळी चौकात एका मोटारीची धडक बसच्या सिलेंडर टाकीला बसली. त्यामुळे सिलेंडर तोटी तुटून गॅस गळती होऊ लागली आणि बसने पेट घेतला. चालक आणि वाहकाने प्रवाशांना तत्काळ खाली उतरविले. कसबा केंद्राचे प्रमुख एस. डी. जिल्हेवार व त्याच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी तत्काळ चौकातील वाहतूक बंद करून इतर रस्त्यावर वाहतूक वळविली. या आगीमुळे या परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. बसचा पाठीमागील भाग जळून खाक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा