पुण्यात एका बस चालकाने रिव्हर्स बस चालवत १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. आरोपीनं बेभानपणे बस चालवल्याने सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना बाहेरही पडता येत नव्हतं. त्यामुळे बसमधील प्रवाशी “आम्हाला वाचावा, बस थांबवा” अशी हाक देत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली.

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संतोष माने प्रकरणाची आठवण यावी असा थरार पुन्हा एकदा पुण्यात घडला. सेनापती बापट रोड परिसरात पीएमपीएमएलच्या बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचा प्रकार घडला. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.”

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील एका सिग्नलवर एमएच १४ एचयू ५७२५ क्रमांकाची पीएमपीएल बस चिंचवड गावाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी बसचालक नीलेश सावंत याने एका चारचाकी वाहनाला कट मारला. त्या चारचाकी वाहन चालकाने आरोपी नीलेश सावंत याला जाब विचारला. यानंतर राग अनावर झालेल्या नीलेश सावंत याने बस रिव्हर्स घेऊन काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर पुढील बाजुला असलेल्या काही वाहनांना धडक देत काही अंतर बस बेभान घेऊन गेला.

या प्रकारानंतर नागरिकांनी बस आडवली आणि आरोपी नीलेश सावंत याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील बस चालविताना शालेय विद्यार्थ्यांसोबत डेक्कन परिसरात आरोपीचा वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.

Story img Loader