पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका माथेफिरूने बस वर दगडफेक केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बस चालकांना लक्ष केलं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हणून पीएमपीएमएल बसची ओळख आहे. मात्र, या दोन घटनांमुळे बस चालकांमध्ये नाराजी आहे. सूर्यकांत कांबळे असे मारहाण झालेल्या बस चालकाचे नाव असून ऋषीकेश ज्ञानदेव घोडेकर अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेले बस चालक सूर्यकांत कांबळे हे पिंपरी नेहरूनगर मार्गावर आपले कर्तव्य बजावत होते तेव्हा डाव्या बाजूने चाललेल्या ऋषीकेशला सूर्यकांत यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यामुळे राग अनावर झालेल्या ऋषीकेशने बस थांबवून थेट सूर्यकांत यांच्या कानशिलात लगावत मारहाण केली. मी कोण आहे माहिती आहे का? अस म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसात सूर्यकांत यांनी तक्रार दिली असून आरोपी ऋषीकेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर, दुसऱ्या घटनेत पीएमपीएमएल बसवर माथेफिरू व्यक्तीने दगडफेक केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना संत तुकाराम नगर परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Story img Loader