पुणे : देशाच्या विकास दरात घसरण होत असताना पुण्यातील उद्योगांमध्ये व्यवसायातील वृद्धीबाबत आशादायी चित्र आहे. पुण्यातील ८४ टक्के कंपन्यांनी वाढीबाबत सकारात्मक मत नोंदविल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) मासिक सर्वेक्षणातून बुधवारी समोर आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एमसीसीआयएकडून १०८ कंपन्यांचे जानेवारीतील मासिक सर्वेक्षण करून त्यांच्या वाढीच्या अपेक्षांबाबतचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाबाबतचा अंदाज कंपन्यांनी या अहवालात वर्तविला आहे. या अहवालानुसार, पुण्यातील ८४ टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. याच वेळी ११ टक्के कंपन्यांना जैसे थे स्थिती अपेक्षित असून, ५ टक्के कंपन्यांनी घट होण्याची शक्यता नोंदविली आहे.
हेही वाचा >>> शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात ३७ टक्के कंपन्यांनी महसुलात २० टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांची संख्या या महिन्यात कमी होऊन २८ टक्क्यांवर आली आहे. याच वेळी १० ते २० टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत २६ वरून वाढून ३२ टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच, १ ते १० टक्के वाढ अपेक्षित असलेल्या कंपन्यांची संख्याही गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढून १९ वरून २४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
हेही वाचा >>> महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यात ५ टक्के मोठ्या कंपन्या (२५० कोटी रुपयांहून अधिक महसूल), ९ टक्के मध्यम कंपन्या, ३० टक्के लघु कंपन्या आणि ५६ टक्के सूक्ष्म कंपन्या आहेत. देशातील उद्योगांच्या सध्याच्या संख्याबळानुसार या सर्वेक्षणात प्रत्येक वर्गातील कंपन्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम कंपन्यांची संख्या देशात जास्त असल्याने त्यांचे या सर्वेक्षणातील प्रतिनिधित्व जास्त आहे.
वाढ – डिसेंबरमधील प्रतिसाद – जानेवारीतील प्रतिसाद (टक्क्यांमध्ये)
२० हून अधिक – ३७ – २८
१० ते २० – २६ – ३२
१ ते १० – १९ – २४
जैसे थे – ९ – ११
नकारात्मक – ९ – ५
संरक्षण, इलेक्ट्रॉनिक उत्पादन आघाडीवर
एमसीसीआयएच्या दोन महिन्यांतील मासिक सर्वेक्षणानुसार संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्या आघाडीवर असून, त्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यातील सर्वेक्षणाच्या तुलनेत सकारात्मक असलेल्या कंपन्यांची संख्या ८१ वरून ८४ टक्क्यांवर पोहोचली आहे. याच वेळी वाढीबाबत नकारात्मक असलेल्या कंपन्यांची संख्या ९ वरून ५ टक्क्यांवर आली आहे.