पुणे : किरकोळ वादातून दुचाकीस्वार व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची कसबा गणपती मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत योगेश गोपाळजी ठक्कर (वय ४५, रा. भवानी पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ठक्कर रविवारी (२६ जानेवारी) कसबा गणपती मंदिरासमोरुन निघाले होते. मंदिराच्या परिसरात ते दुचाकी लावण्यासाठी जागा शोधत होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ठक्कर यांना शिवीगाळ केली. गाडी नीट चालव, असे सांगून दोघांनी ठक्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ठक्कर यांच्या पाठीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दोघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple pune print news rbk 25 zws