लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : वराह पालन व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठेत घडली. व्यावासयिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राजा परदेशी (वय ४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळाशेजारी, हरकानगर, कासेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत पत्नी कंचन राजा परदेशी (वय ३८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी यांचे ताडीवाला रस्ता परिसरात गोदाम आहे. लक्कडसिंग त्यांना वराह पुरवितो, वराहाचे मांस विक्रीचा परदेशींचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात परदेशी यांच्या गोदामात पाणी शिरल्याने नुकसान झाले. गोदामात ठेवलेल्या दहा लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले.

आणखी वाचा-सराफी पेढीवर दरोड्याच्या तयारीतील तिघांना पकडले, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

आर्थिक नुकसान झाल्याने परदेशी यांनी लक्कडसिंगला पैसे परत करण्यासाठी वेळ मागितला. तेव्हा लक्कडसिंगने पैसे परत करण्यासाठी तगादा लावून त्यांना शिवीगाळ केली. मुलांचे अपहरण करण्याची धमकी त्याने दिली होती. त्याच्या त्रासामुळे परदेशी यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. परदेशी यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman commits suicide due to financial issues in bhavani peth pune print news rbk 25 mrj