पुणे : अनैतिक सबंधातून एका व्यावसायिकाने पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका महिला वकिलाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत व्यावसायिकाच्या पत्नीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.

हेही वाचा >>> वाल्मिक कराड प्रकरण: CID आणि SIT कुणाच्या दबावाखाली? अजित पवार स्पष्टच बोलले…

Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…

पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये व्यावसायिकाने गळफास घेऊन ९ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यावेळी महिला वकील तेथे उपस्थित होती. या महिला वकीलाचे पती न्यायाधीश असून त्यांना यांच्यातील अनैतिक संबंधांची कल्पना होती, असे व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वकील आणि व्यावसायिकाची व्यावसायिक कारणातून ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला वकिलाने पत्नी आणि मुलाला सोडून दे. माझ्यावर रहा, असे सांगून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा >>> महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

व्यावसायिकाचा मुलगा आणि आरोपीं महिलेची मुलगी यांचा विवाह लावून दे, अशी धमकी दिली. व्यावसायिकाने महिलेकडून व्यावसायिक कारणासाठी ३० लाख रुपये उसने घेतले होते. पैसे न दिल्याने व्यावसायिकाच्या नावावर असलेली सूस परिसरातील सदनिका नावावर करुन देण्याची मागणी केली. ९ जानेवारी रोजी महिला वकिलाने व्यावसायिकाला पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये बोलावून घेतले होते. पत्नी आणि मुलाला सोडून दे. अन्यथा माझ्यासमोर आत्महत्या कर, अशी धमकी दिली. त्यानंतर व्यावसायिकाने लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी महिला वकील तेथे उपस्थित होते, असे व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader