कोथरुडमधील गजा मारणे टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला वीस कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने मारणे टोळीतील रुपेश मारणेसह चौघांना अटक केली आहे.अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाची सुटका करण्यात आली आहे. रुपेश मारणेसह हेमंत पाटील, पप्पू घोलप आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेले व्यावसायिक यांचा शेअर बाजारात गुंतवणूक आणि जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून हेमंत पाटीलने त्यांच्याकडे शेअर बाजारात पैसे गुंतवले होते. फिर्यादी यांच्याकडून त्यातील काही न रक्कम मिळाल्याच्या कारणावरून गजा मारणे टोळीतील आरोपींनी फिर्यादीवर पाळत ठेवून त्यांचे सात ऑक्टोबरला सायंकाळी कात्रज येथून अपहरण केले. जबरदस्तीने गाडीमध्ये बसून यांचे अपहरण करण्यात आले. मुंबई बेंगलोर महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. फिर्यादीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली. तसेच वीस कोटीची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतीत खंडणी विरोधी पथक दोनला माहिती मिळाल्यानंतर चौघाना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले गजा मारणे टोळीतील आहेत.