मागेश इथिराजन, महासंचालक, ‘सी-डॅक’

‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. सन १९८८ मध्ये तिची स्थापना झाली. मानवी आणि आर्थिक विकासासाठी जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची (आयसीटी) निर्मिती, विकास आणि ते दैनंदिन वापरात आणण्यासाठी प्रमुख संशोधन आणि विकास (आर अँड डी) संस्था या हेतूने ‘सी-डॅक’ची स्थापना करण्यात आली आहे.

investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
Mission Bhagirath Prayas
नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
mumbai municipalitys bridge connecting Marve and Manori beaches has received approval
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी

उच्च कार्यक्षमतेेेचे संगणन, कृत्रिम प्रज्ञा आणि बहुभाषिक संगणन आणि ‘हेरिटेज कॉम्प्युटिंग’, ‘मायक्रो प्रोसेसर आणि स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स’, ‘हेल्थ इन्फॉर्मेटिक्स’, सायबर सुरक्षा आणि ‘सायबर फॉरेन्सिक्स’, संगणकप्रणाली तंत्रज्ञान (ई-गव्हर्नन्स / जिओ-इन्फॉर्मेटिक्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीज्, ५ जी, इंटरनेेट ऑफ थिंग्ज (आयओटी), एसडीएन, एज कॉम्प्युटिंग आणि शिक्षण-प्रशिक्षणाद्वारे ‘सी-डॅक’ने सहा मोहीमवजा कार्यक्रम आखले आहेत. १) एक्झा-स्केल कॉम्प्युटिंग मिशन, २) मायक्रो प्रोसेसर मिशन, ३) क्वॉण्टम कॉम्प्युटिंग मिशन, ४) एआय आणि लँग्वेज कॉम्प्युटिंग मिशन, ५) इंटरनेट ऑन एव्हरीथिंग (आयओई), डिपेंडेबल आणि सिक्योर कॉम्प्युटिंग मिशन ६) जेननेक्स्ट अप्लाइड कॉम्प्युटिंग मिशन. या सर्वांतच उच्च कार्यक्षमतेेेच्या संगणनाचा वापर केला जाईल. तसेच कृत्रिम प्रज्ञेचेही बहुपयोगी तंत्रज्ञान म्हणून साहाय्य घेतले जाईल.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : किंग ऑफ व्हॅक्सिन

‘सी-डॅक’चे अलीकडचे नावीन्यपूर्ण विशेष योगदान म्हणजे संशोधन आणि विकास (आर अँड डी) विभागाने अवलंबलेली धोरणे. त्यामुळे आपल्या देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी विविध स्वदेशी उत्पादने आणि उपायांच्या अंमलबजावणीचा चांगला पाया घातला आहे. यामध्ये ‘सी-डॅक’ने विकसित केलेल्या स्वदेशी ‘रुद्रा एचपीसी सर्व्हर बोर्ड’ ते ‘त्रिनेत्र हाय स्पीड इंटरकनेक्ट’, ‘सी-डॅक’च्या स्वत:च्या उच्च कार्यक्षमतेच्या संगणनासाठी ‘एचपीसी’साठी एकात्मिक संगणकप्रणाली, ‘बीआरएएफ बायो-इन्फॉर्मेटिक्स क्लस्टर विथ व्हिज्युअलायझेशन’सह ‘एकात्मिक हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनां’ना या धोरणाचा लाभ झाला आहे. तसेच ‘सी-डॅक’च्या स्वत:च्या ‘डीआयआर-व्ही आधारित चिप’ची संरचना विकसन आणि निर्मिती आणि ‘एआरएम आधारित एचपीसी प्रोसेसर’पासून ‘एचपीसी स्टोरेज’,‘एचपीसी-एआय कन्व्हर्ज्ड सोल्युशन्स फॉर सेफ सिटी इन ईआरएसएस आणि स्मार्ट सिटीज्’, ‘स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन सिस्टम’, ‘बिग डेटा अॅनालिटिक्स इन अॅग्रीकल्चर, हेल्थ, एज्युकेशन अँड पॉवर’, ‘इंटिग्रेटेड सायबर फिजिकल सिस्टिम्स’, ‘एआय बेस्ड अॅनोमली डिटेक्शन फॉर सायबर सिक्युरिटी’ ते ‘इंडिया एआय क्लाउड’ आणि ‘एचपीसी-एआय कन्व्हर्ज्ड प्रोसेसर’सह विविध स्वदेशी उत्पादने आणि उपाययोजनांसाठी एक चांगला पाया घातला आहे.

‘सी-डॅक’ने आधीच आपल्या ‘एक्झा स्केल कॉम्प्युटिंग मिशन मोड प्रोग्राम’ला सुरुवात केली आहे आणि भारतातील ‘एक्झा फ्लॅप सुपरकॉम्प्युटिंग सिस्टम’ची स्वदेशी बनावट, विकास, जडणघडण आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याद्वारे ‘सर्व्हर बोर्ड’, ‘प्रोसेसर’, ‘एक्सलरेटर’, ‘इंटरकनेक्ट’, ‘सॉफ्टवेअर स्टॅक’, ‘सिस्टम सॉफ्टवेअर’ आणि ‘मिडलवेअर’, ‘स्टोरेज’, ‘स्पेशल पर्पज मशिन्स’ आणि ‘चेसिस’ यांसारखे क्लिष्ट तंत्रज्ञानयुक्त घटक भारतात बनवले जातील. हा कार्यक्रम ‘सुपरकॉम्प्युटिंग’ तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या ‘सी-डॅक’च्या दृढसंकल्पातून सहजपणे नैसर्गिकरीत्या उत्क्रांत झाला आहे.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

‘क्वॉण्टम टेक्नॉलॉजीज आणि अॅप्लिकेशन्स’संबंधी (एनएम-क्यूटीए) राष्ट्रीय मोहीम आणि क्वॉण्टम तंत्रज्ञानासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ‘यंग सायंटिस्ट्स लॅबोरेटरी’च्या (डीवीयएसएल-क्यूटी) सर्वोच्च समितीत ‘सी-डॅॅक’चा सक्रिय सहभाग आहे. ‘सी-डॅॅक’ यात ‘क्वॉण्टम’ तंत्रज्ञानातील नवीनतम आणि क्रांतिकारी क्षेत्राचा शोध घेण्याच्या मोहिमेसह त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांसह सातत्याने योगदान देत आहे. ‘सी-डॅॅक’कडून ‘क्यू सिम’ हे ‘क्वॉण्टम कॉम्प्युटर सिम्युलेटर टूलकिट’ संशोधक आणि विद्यार्थ्यांना ‘क्वॉण्टम कॉम्प्युटिंग’मध्ये किफायतशीर पद्धतीने संशोधन करण्यास पूरक ठरण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारतातील ‘क्वॉण्टम कॉम्प्युटिंग’ संशोधनाची व्याप्ती विस्तारण्याचे समाईक आव्हान हाताळण्यासाठी उपयोगी ठरेल, अशा देशातील अग्रगण्य उपक्रमांपैकी ‘क्यू-सिम’ हा एक उपक्रम आहे. याद्वारे शिक्षण, आण्विक गतिशीलता (मॉलिक्युलर डायनॅमिक्स), वसुंधरा विज्ञान, आरोग्यसेवा, संगणकीय जीवशास्त्र आणि औषधांचा शोध, हवामान प्रारूप, हवामान आणि आपत्ती अंदाज, भूगर्भशास्त्रीय संशोधन (खनिज तेल, वायू आणि खनिजांचा शोध), कृत्रिम प्रज्ञा, व्यापक विदा विश्लेषण तंत्र (बिग डेटा अॅनेलिटिक्स), ‘मटेरियल्स अँड कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री’ यांसारखी महत्त्वाची क्षेत्रे, तसेच वाहन उद्याोग, अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात उच्च दर्जाच्या संशोधनात लक्षणीय योगदान मिळेल. पर्यायाने आपल्या देशाचा सामाजिक-आर्थिक विकासास हातभार लागेल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी, राष्ट्रीय हितासह अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी शिक्षण, संशोधन आणि विकास संस्था, संबंधित मंत्रालयीन विभाग, नवउद्यामींमध्ये (स्टार्ट अप) नवीन बहुपयोगी उत्पादने आणि उपाय शोधण्यासाठी परस्पर सहकार्य झाल्यास ती अत्यंत स्वागतार्ह बाब ठरेल.

Story img Loader