लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : लोकसभा निवडणुकांमुळे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती आयसीएआयकडून या पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले असून, आता परीक्षेचे नवीन वेळापत्रक १९ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.

आणखी वाचा- पुण्यातील दहा हजार गुंड रडारवर; १६ संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष

आयसीएआयने या पूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इंटरमिजिएट गट एकची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी होणार होती. गट दोनची परीक्षा ९, ११ आणि १३ मे रोजी होणार होती. सीए अंतिम गट एकची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, गट दोनची परीक्षा ८, १० आणि १२ मे रोजी घेण्यात येणार होती. तर फाउंडेशन परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जून रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीला पूर्ण झाली आहे.