पुणे : पर्वती जलकेंद्राच्या आवारातील केबिनला आग लागून पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी गंभीर जखमी झाला. कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आगीमागचे कारण समजू शकले नाही. शॅार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लाला गणपत बांदल (वय ५५ रा. वडाचीवाडी, ता. हवेली. जि. पुणे) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.. बांदल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला आहेत. मंगळवारी सकाळी टँकर भरणा केंद्रातील बांदल केबिनमध्ये होते. त्या वेळी तेथे आग लागली. काही वेळात केबिनने पेट घेतला. जलकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर बांदल यांना केबिनमधून बाहेर काढण्यात आले. आगीत बांदल होरपळले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader