शिवाजी खांडेकर

कामचुकार वाहतूक पोलिसांना पिंपरी पोलीस आयुक्तांचा झटका

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
complaint with allegations against Ranjit Kamble says he is sand mafia and gangster
‘रणजित कांबळे हे रेती माफिया, गुंडागर्दी करणारे’, आरोपासह तक्रार
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करण्याचे सोडून आपापसात गप्पा झोडणाऱ्या कामचुकार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी चांगलाच झटका दिला. त्या कर्मचाऱ्यांना अ‍ॅटोक्लस्टर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून सर्वाच्या समोर कवायत करण्याची शिक्षा दिली. आयुक्तांच्या अशा प्रकारे दिलेल्या शिक्षेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

आयुक्त पद्मनाभन हे मोटारीतून आयुक्तालयाच्या हद्दीत चिंचवड स्टेशन येथून जात असताना तेथील चौकामध्ये दोन वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, वाहतूक नियमनाचे काम न करता चौकामध्ये एका बाजूला थांबून ते गप्पा मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शहरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चिंचवड स्टेशनसारख्या व्यस्त चौकामध्ये वाहतुकीचे योग्य नियमन आवश्यक आहे. असे असतानाही कामचुकारपणा केला जात असल्याने पोलीस आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना आयुक्त कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. वाहतूक पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅटोक्लस्टर येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना कवायत करण्याची शिक्षा दिली. या वेळी इतर पोलीस कर्मचारीही आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित होते.  आयुक्तांच्या अशा प्रकारच्या अनोख्या शिक्षेमुळे कामचुकार पोलीस कर्मचारी ओशाळले होते. उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याच सहकाऱ्यांना दिलेली शिक्षा डोळ्याने पाहिल्याने आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे.

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कामचुकार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.मोबाइल चोरीची चौकशी करताना आरोपींना मारहाण करुन पैसे उकळल्याप्रकरणी एका सहायक फौजदारासह पोलीस हवालदारावर गेल्या महिन्यात निलंबनाची कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच हिंजवडी येथील एका सहायक पोलीस निरीक्षकाने पीडित तरुणीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास उशीर केला म्हणून त्याच्यावर कारवाई करुन नियंत्रण कक्षात बदली केली. अशा प्रकारच्या कारवाईच्या बडग्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर पोलीस आयुक्तांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य केले पाहिजे. कामचुकारपणा आणि चुकीचे काम करणारांवर कारवाई केली जाणार आहे.

– आर.के.पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड</p>