मिळकतकर थकबाकीदारांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. पिंपरी पालिका भवन विभागीय कार्यालयाने ११ मिळकती सील केल्या आहेत. वेळेत कर भरून कारवाई टाळण्याचे आवाहन पालिकेच्या करसंकलन विभागाने केले आहे. या विभागीय कार्यालयाचे सहायक मंडलाधिकारी संतोष कोराड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. दत्तात्रय सातव, राजकुमार यादव, अरविंद वाघमारे, मुकुंद वाखारे, अशोक तांडेल, भानुदास मोहिते यांचा या पथकात समावेश आहे.
हेही वाचा >>>नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटीमुळे राज्यसेवेत काही उमेदवार अपात्र
नेहरूनगर, खराळवाडी, संत तुकारामनगर येथील मिळकत थकबाकीदारांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेने जुलै महिन्यापासून मोहीम सुरू केली आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वेळेत मिळकतकर भरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. थकीत रक्कम न भरणाऱ्यांच्या ११ मिळकती सील करण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मनपा भवन विभागीय कार्यालयाने ३७ कोटी ४२ लाख रूपये उत्पन्न प्राप्त केले आहे. त्यात चालू मिळकतकराबरोबरच थकबाकीदारांनी भरलेल्या रकमेचाही समावेश आहे.