लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.

पिंपरी वाघेरे येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय तळमजला मतदान केंद्र ३१०, खोली क्रमांक ३ या ठिकाणी मतदान केले. त्यांच्यासोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश यांनीही मतदान केले.