पुणे : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी कागदपत्र तपासणीकडे पाठ फिरवली आहे. पात्र ४६० उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात आल्यानंतर ११९ उमेदवार अनुपस्थित राहिल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या वतीने पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे. यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन विभाग, स्थापत्य विभागासाठी कनिष्ठ अभियंता, सहाय्यक विधी अधिकारी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि लिपिक या पदांसाठी ४४८ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी ८६ हजार ९९४ अर्ज आले होते. मात्र, त्यापैकी ६७ हजार २५४ उमेदवारांनी परीक्षा दिली. लिपिक पद वगळता इतर सर्व पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

हेही वाचा : सार्वजनिक-खासगी लोकसहभागातून रस्त्यांचा विकास; पुणे महापालिकेकडून निविदा प्रक्रिया

कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या १३५ जागा आहे. या पदासाठी १२ हजार ७०४ जणांनी परीक्षा दिली होती. एका जागेसाठी एकास तीन या प्रमाणे ४६० उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले होते. मात्र यातील ११९ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहिल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. सध्या १३५ पदांसाठी केवळ ३४१ जणांचीच कागदपत्र पडताळणी होऊ शकली आहे. त्यातही अनेकांनी बनावट अनुभवपत्र जोडल्याचा आरोप महापालिकेवर झाला आहे.