पुणे : पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) जाहीर केला आहे. त्यानंतर बार्टीच्या निर्णयाच्या धर्तीवर आता छत्रपती शाहू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनेही (सारथी) पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उमेदवारांनी उपोषण सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत २०१९च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यावर आक्षेप घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत आधीची परीक्षा रद्द करून १० जानेवारीला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी १० जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.

हेही वाचा >>>अयोध्येतील राममंदिर अक्षता वितरणाची पुणे महानगरात सुरुवात; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अजित पवार यांना निमंत्रण

आता सारथीतर्फे दिल्या जाणाऱ्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांनी सोमवारी आंदोलन सुरू केले. आंदोलकांपैकी सौरभ शिंदे म्हणाले, की बार्टीने ज्याप्रमाणे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे सारथीनेही परीक्षा रद्द करून उमेदवारांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला पाहिजे.दरम्यान, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय धोरणात्मक आहे. या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सारथीचे कुलसचिव संजीव जाधव यांनी सांगितले.