आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस पक्षांचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला जीवदान; अग्निशमन दलाची कामगिरी

हेही वाचा – पुणे: नवी पेठेतील अभ्यासिकेत आग

या बैठकीनंतर प्रशांत जगताप म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील प्रमुख नेते मंडळींची बैठक झाली आहे. निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असून येत्या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींच्या सभा, मेळावे आणि रॅली होणार आहेत. त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे चर्चा झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण आम्ही सर्वजण येणार्‍या निवडणुकीसाठी तयार आहोत, जे निष्ठावंत आहेत आणि नागरिकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. अनेक विकासकामे केली आहेत. त्या इच्छुक मंडळांचा निश्चित विचार होईल, त्यामुळे शहरात दुसरे काही चुकीचे होईल, असे वाटत नाही आणि जे उमेदवार जिंकतील आशांना निश्चित उमेदवारी दिली जाईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.