पुणे : मध्य रेल्वेच्या ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत चिंचवड रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे डब्यातील आकर्षक उपहारगृह साकारण्यात आले आहे. ‘चिंचवड एक्स्प्रेस’ असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, या उपक्रमामुळे स्थानक परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासह खवय्या प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
वापरातून बाद झालेल्या रेल्वेच्या डब्यांचा आणि इतर साहित्यांचा वापर करून स्थानकाच्या मोकळ्या जागेमध्ये ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून विविध रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे उपहारगृह साकारण्यात आले आहेत. चिंचवड स्थानकाच्या परिसरातही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वापरात नसलेला रेल्वेचा डबा त्यासाठी वापरण्यात आला आहे. त्याला बाहेरून आकर्षक रंगसंगतीने सजविण्यात आले आहे. आतील बाजुला रेल्वेतील आसनांप्रमाणेच प्रवाशांना खाद्यापदार्थाचा आश्नाद घेण्यासाटी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपहारगृहाच्या डब्यातील आतील रचना आधुनिक पद्धतीने साकारण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे: सवाई गंधर्व महोत्सवावर पं. जसराज यांचे प्रेम; दुर्गा जसराज यांचे मत
पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांच्या हस्ते या उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले. अपर रेोल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्नील निला, वरिष्ठ यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, जौएल मैकेंजी, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील, सामग्री व्स्स्थापक विनोद कुमाप मीणा आदी प्रमुख त्या वेली उपस्थित होते. चिंचवड स्थानकापाठोपाठ आता मिरज आणि बारामती रेल्वे स्थानकावरही हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने काम सुरू करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.