पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी कार्यालयीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ११ जानेवारीला मतदान होणार आहे. २० नोव्हेंबपर्यंत मतदार याद्यांमध्ये नावनोंदणी करणाऱ्यांना या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये एकूण आठ वॉर्ड असून, त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरपासून अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. १० ते ११ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १६ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत राहील. १९ डिसेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदार याद्यांमध्ये नावे नोंदविण्यासाठी २० नोव्हेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरला मतदार याद्यांबाबत हरकती व सूचना घेण्यात येणार आहेत. १ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल. बोर्डातील एकूण आठ वॉर्डामध्ये चार क्रमांकाचा वॉर्ड अनुसूचित जाती-जमातींसाठी, तर एक, सात व आठ हे वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. ११ जानेवारीला सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी रात्री दहापासून किंवा १२ जानेवारीला सकाळी आठपासून मतमोजणी करण्यात येईल. एकूण ५० मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रांद्वारे मतदान केले जाणार आहे, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा