‘उद्या सकाळी मला भेटा, साडेआठ वाजता, सिंहगडावर’, ‘आजची घोरपडीची प्रचार
या आहेत पुण्यातील लोकसभा उमेदवारांच्या ‘फेसबुक’ नोंदी! त्यांच्या पदयात्रांच्या वेळा, सभांची ठिकाणे, पुण्याच्या प्रश्नांवरची त्यांची मते, त्यांचे आतापर्यंतचे कार्य यातील काहीही जाणून घ्यायचे असेल, तर आपल्या उमेदवाराचे फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट उघडून पाहा.
सोशल मीडियावर सतत ‘अॅक्टिव्ह’ असणाऱ्या शहरातील ३ ते ४ लाख नवमतदारांबरोबरच सुशिक्षित मध्यमवयीन मतदारांपर्यंतही पोहोचण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणून फेसबुक आणि ट्विटरवरचा प्रचार सध्या भरात आला आहे. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पक्ष अशा चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार सोशल मीडियावरून जोरात सुरू आहे. चारही पक्षांच्या सोशल मीडिया प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घेतली. फेसबुक, ट्विटर आणि संकेतस्थळावर नागरिकांनी नोंदवलेली मते उमेदवारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचवण्यासाठी प्रत्येक पक्षाची वेगळी टीम आहे. पक्षाच्या धोरणाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम या सोशल मीडिया टीमचे कार्यकर्ते उमेदवाराच्या नावे करतात. उमेदवाराला वैयक्तिक रीत्या विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र उमेदवार स्वत: देत आहेत.
काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांची स्वतंत्र मोबाइल अॅप्सही आहेत. उमेदवाराच्या ‘प्रोफाइल’पासून तो आता या क्षणी प्रचारासाठी कुठे आहे या सगळ्याची इत्थंभूत माहिती ही अॅप्स पुरवत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा