पिंपरी चिंचवड या ठिकाणी असलेल्या चिखली भागात एका कारने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक पेट घेतला. ही कार जळून खाक झाली, मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारला आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली. CNG लीक झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतला. पिंपरीकरांना बर्निंग कारचा थरार अनुभवयाला मिळाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीएनजी लीक झाल्याने कारने अचानक पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त होतो आहे.

Story img Loader