पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजविल्याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. येरवडा कारागृहातून कसबे बुधवारी सायंकाळी बाहेर आला. त्याच्या समर्थकांनी काढलेली वाहन फेरी समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. मात्र, त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली दहशत पसरवणारी फेरी त्याला आणि त्याच्या समर्थकांना चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!

प्रफुल्ल कसबे हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास समर्थकांनी त्यांच्याकडील चारचाकी गाड्या तसेच २० ते ३० दुचाकी गाड्यांवरून फेरी काढली. विनापरवाना फेरी काढून, गाड्या बेदकारपणे चालवून आरडा ओरडा आणि घोषणाबाजी करून परिसरात दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कसबे याच्यासह पन्नासहून अधिक जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> देशात विकास दरात घसरण होत असताना पुण्यातील उद्योगांचे आश्वासक चित्र! एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

फेरी कारवाईच्या फेऱ्यात

चार वर्षापूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या फेरीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर मोक्काचे सत्र सुरू झाले होते. गेल्या चार वर्षांत सुमारे २४० टोळ्यांवर मोक्काची कारवाई झाली. त्यापैकी एका मोक्काच्या कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामीनावर सुटला. मात्र, त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली फेरी त्याला कारवाईच्या फेऱ्यात अडकवणारी ठरली. त्याच्यासह टोळक्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुटपुंज्या कारवाईनंतर रिल्सस्टार पुन्हा सक्रीय

चौकट शहरात विविध टोळ्यांचे गुंडांचे समर्थन करणारे आणि दहशत पसरविणारे रिल्स, छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहेत. मात्र, तुटपुंज्या कारवाईनंतर रिल्सस्टार पुन्हा सक्रीय होताना दिसत आहे. पोलिसांकडून कडक कारवाईचे इशारे दिले जात असले तरी प्रत्यक्षात कडक कारवाई होताना दिसत नसल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे.