चिंचवड : चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर नक्कीच कामे मिळतात, त्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, असे स्पष्ट मत हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने गुरूवारी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. गुडीपाडव्याच्या महुर्तावर (२२ मार्च) ‘ फुलराणी ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने दिशा सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आकुर्डी व चिंचवड येथील आयोजित कार्यक्रमात प्रियदर्शनी हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिग्दर्शक विश्वास जोशी, माजी महापौर अपर्णा डोके, दिशाचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, सचिन साठे, अविनाश ववले, एनआयबीआरच्या प्राचार्या मृदुला गायकवाड, ब्लॉसम शाळेच्या प्राचार्या शारदा भूषण आदी उपस्थित होते.

“आपल्या मनात नाकारले जाण्याची (रिजेक्शन) भीती असता कामा नये, गुणवत्ता असलीच पाहिजे व त्यासोबत आत्मविश्वासही असला पाहिजे, तुमच्यातील विश्वास दिसला की गुणवत्ताही दिसून येते. चित्रपटसृष्टीतील वाईट अनुभवांविषयी अनेकदा बोलले जाते. पण प्रत्यक्षात मला असा कोणताही अनुभव आला नाही. आपल्या हातात असते की आपण कोणती भूमिका घ्यायची. गुणवत्तेच्या जीवावर कामे मिळतात. तुमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत. अभिनयाच्या जोरावर ऑडिशनमधून निवड झालेली ही फुलराणी त्याचे उत्तम उदाहरण आहे”, अशी भूमिका प्रियदर्शनीने यावेळी मांडली.

bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
110 crore plan approved for Sky Walk with Pandharpur Darshan Pavilion
पंढरपूर दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’साठी ११० कोटींच्या आराखड्याला मान्यता

हेही वाचा… पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई शहर सुरक्षित आहे, काळजी घेते, कधीच एकटे वाटू देत नाही, मुंबई शहराने आत्मविश्वास दिला. अनुभवातून असे लक्षात आले, की आपण जितके घाबरतो, तितके आपल्याला घाबरवले जाते, आपल्यात धमक असल्यास कोणी काहीही करू शकत नाही, असे तिने ठामपणे सांगितले. अफलातून ते फुलराणीपर्यंतचा आपला आतापर्यंतचा प्रवास उलगडताना प्रियदर्शनी म्हणाली ” माझा जन्म सांगलीचा आहे. बाकी तशी मी संपूर्णपणे पुणेकर आहे. लहानपणी अफलातून नावाच्या टीव्ही शो मधून सुरूवात झाली. त्यात मी स्टँड अप कॉमेडी करून दाखवली होती. अनपेक्षितपणे त्याची मी विजेती ठरले होते. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात (एन.एस.डी) प्रवेश मिळावा, यासाठी मी सहा वर्षे तयारी केली. मात्र ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. तेव्हा खूप वाईट वाटले होते. आपल्यात काय कमी आहे, असा प्रश्न सतत मनात येत होता. हास्यजत्रा तेव्हा नुकतेच सुरू झाले होते. गणेश सागडे यांनी हास्यजत्रेसाठी नाव सुचवले. तेव्हा वय लहान होते म्हणून निवड झाली नाही. पण त्याच ऑडिशनमुळे मग काही नाटकांचे प्रयोग केले”.

हेही वाचा… पुणे : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून व्यवस्थापकाने घातला ७२ लाखांचा गंडा

निखील रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर आदींशी तेव्हा ओळख झाली. त्यांचे खूपच सहकार्य लाभले. मुंबईत पदार्पण झाले. मात्र सुरूवातीला मुंबई-पुणे येऊन जाऊन करत होते. सुदैवाने संघर्षाचा फार कठीण काळ अनुभवावा लागला नाही. अनेक चांगली लोकं भेटली. हास्यजत्रेचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. २२ मार्चला गुडीपाडव्याला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. फुलराणीत शेवंता तांडेल ही मुख्य भूमिका मी साकारत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळेल, अशी आशा प्रियदर्शनीने व्यक्त केली.