पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी सांगवीतील शितोळेनगर आणि प्रियदर्शनीनगर या भागात जवळपास २५ वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही भागातील वाहनतळांमध्ये लावण्यात आलेल्या मोटारींची दगड, विटांचा मारा करत एकापाठोपाठ तोडफोड करण्यात आली. जवळपास २५ मोटारी फोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा धुमाकूळ सुरू आहे. परस्परांच्या वादाचा राग मोटारींवर काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असून त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांचे नियंत्रण नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.
सांगवीत मोटारींची तोडफोड
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-08-2016 at 03:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cars damaged in pimpri chinchwad city