पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस कर्माचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे  शनिवारी (२ सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात अखिल भारतीय समन्वय समिती बैठक

भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against 150 people including sambhaji bhide for taking rally even after denied permission pune print news rbk25 zws
Show comments