पुणे : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करुन झटापट, धमकाविल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करुन त्यांना कोंढवा भागात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली होती. हाके यांच्याशी झटापट करुन त्यांना धमकावले होते. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मते नावाच्या व्यक्तीसह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लक्ष्मण सोपान हाके (वय ४२, मूळ रा. सोलापूर, सध्या रा. निर्माण क्लासिक सोसायटी, कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती

हेही वाचा – राज्यातील उद्योग पलायन ऐरणीवर! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण एमआयडीसीवरून महायुतीची कोंडी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर सोमवारी रात्री हाके यांना घेराव घालण्यात आला. ‘कोल्हापुरातील छत्रपती संभाजी राजे यांच्याविरुद्ध बोलतो काय ?,’ तुला बघून घेतो, अशी धमकी हाके यांना देण्यात आली. काहीजणांनी हाके यांना शिवीगाळ केली. हाके यांच्याशी झटापट केली. झटापटीत हाके यांचा खांदा दुखावला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हाके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळावारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against 20 to 25 people in case of abuse of obc leader laxman hake pune print news rbk 25 ssb