पोलीस चौकीत गोंधळ घालणाऱ्या तीन तरुणींना समजावून सांगणाऱ्या पोलिसांच्या दामिनी पथकातील तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन तरुणीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन तरुणींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात तरुणींचे वाद झाले होते. त्या पैकी एक तरुणी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आली. तिच्या पाठोपाठ तीन तरुणी पोलीस चौकीत आल्या आणि पोलीस चौकीतील महिला पोलिसांनी तिघींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा तिघींनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाल्या. तरुणींनी दामिनी पथकातील महिला पोलिसांशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तिघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.