लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

sunil shelke shankar won by lakh votes
Chinchwad and Maval Vidhan Sabha : चर्चा तर होणारच: भाजप चे ‘शंकर जगताप’ १ लाख, ‘सुनील शेळके’ १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजयी
vadgaon sheri election result 2024 BSP candidate Dr Hulgesh Chalwadi going to challenge result in supreme court against EVM use
‘ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात; पराभवानंतर वडगाव शेरीतील उमेदवार आक्रमक
parvati assembly election result 2024 update Three candidates named Ashwini Kadam contested the election
पर्वतीत नामसाधर्म्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्विनी कदमांना फटका? दोन अपक्ष अश्विनी कदमांना किती मते जाणून घ्या…
assembly election 2024 NCP candidate Bapusaheb Pathare defeated Sunil Tingre by 4569 votes in Vadgaonsheri assembly constituency
वडगावशेरीत चुरशीची परंपरा कायम- शहरात ‘तुतारी’ वाजली
BJP Mahesh Landge Ajit Gavhane Bhosari vidhan sabha
Bhosari vidhan sabha election results 2024 : भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक; अजित गव्हाणेंचा केला पराभव
Rahul kalate Defeat in Chinchwad will hurt Sharad Pawar says Shankar Jagtap afater assembly election result
Chinchwad Assembly Constituency : अमोल कोल्हेंच्या हट्टापायी कलाटेंना उमेदवारी; चिंचवडमधील पराभव शरद पवारांच्या जिव्हारी लागणारा- शंकर जगताप
Assembly Election Result 2024 BJPs Madhuri Misal wins fourth consecutive term asserting dominance in Parvati Constituency
‘पर्वती’वर भाजपचा झेंडा! सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार
assembly election 2024 ncp sharad pawar candidate Prashant Jagtap objected to results in Hadapsar and demanded vote recount
हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी

काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

आणखी वाचा-लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.